इंटेलचा नवा ' कोअर आय सेव्हन ' प्रोसेसर बाजारात दाखल  

Posted by शैलेश पिंगळे



इंटेलचा नवा ' कोअर आय सेव्हन ' प्रोसेसर बाजारात दाखल
आता तुमचा संगणक होणार सुपरफास्ट..
जर तुम्ही अजुनही पेन्टियम ४ या सिरिजचे संगणक वापरत असाल तर तुम्ही खुप मागे आहातकारण इंटेल कोअर टु ड्यु प्रोसेसर पण आता जुना झालाय इंटेलने बाजारात आता नविन आणी सुपरफास्ट कोअर आय सेव्हन ' हा नवा प्रोसेसर लॉंच केला. हा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा इंटेलचा दावा आहे कोम्प यूजरच्या नव्या गरजा लक्षात घेऊन ' नेहलम प्रोसेसर ' या नव्या मालिकेअंतर्गत इंटेलने आणलेला ' कोअर आय सेव्हन ' हा पहिलाच प्रोसेसर आहे. ९६५, ९४० आणि ९२० या तीन सिरीजमध्ये आणलेले हे प्रोसेसर जे अनुक्रमे ३.२० गिगाहर्टझ, २.९३ गिगाहर्टझ आणि २.६६ गिगाहर्टझ या क्लॉकस्पीडमध्ये बाजारात उपलब्ध असतील. हे प्रोसेसर डीडीआर३-१०६६ मेमरीला सपोर्ट करतील. त्यामुळे हे प्रोसेसर भन्नाट स्पीडचा अनुभव देतील, असे इंटेलचे म्हणणे आहे.


ब्लॉग कसा करायचा?  

Posted by शैलेश पिंगळे

तुम्हीही अत्यंत सोप्या पद्धतीने ते तयार करू शकता. blogger.com चे उदाहरण देता येईल. अगदी मिनिटभरात स्वत:चा ब्लॉग सुरू करू शकता. त्यासाठी तुमचा मेल आयडी आधीपासून असायला हवा. इथे नवे मेल अकाऊंट ओपन करता येत नाही. साइट गूगलशी संबंधित असली तरी जीमेलचेच अकाऊंट वापरावे लागते असे नाही. हॉटमेल अथवा याहूचेही चालेल. सुरुवातीला हा आयडी दिला की त्याचा पासवर्ड टाइप करायचा.

पासवर्ड देऊन झाल्यावर तुम्हाला ब्लॉगवर कोणते नाव हवे आहे ते द्यावे लागते. तुम्ही अगदी वेगळे नावही देऊ शकता. ते नाव तुमच्या ब्लॉगवर दिसत राहील. नंतर वर्ड व्हेरिफिकेशन होते. साइटवर काही इंग्रजी अक्षरे दिसतात. तीच अक्षरे त्याच क्रमाने त्याखालील बॉक्समध्ये टाइप करा. मग रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा पूर्ण होतो. दुसऱ्या टप्प्यात या ब्लॉगला नाव द्यावे लागते. ते ठळकपणे ब्लॉगच्या वर दिसत राहील. नंतर ब्लॉगचा अॅड्रेस. तुमचा जसा ईमेल आयडी असतो, तसाच हाही ब्लॉग आयडी असतो. तो एकदा दिल्यावर बदलता येत नाही. वाटले तर दुसऱ्या नावाने तुम्ही दुसरा ब्लॉग सुरू करू शकता. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक नाव द्या. हे नाव तुमचे स्वत:चे असू शकते तसेच दुसरे काहीही असू शकते. समजा तुम्हाला आयलव्हक्रिकेट असे नाव द्यायचे असेल तरी काही हरकत नाही. फक्त ते आधी इतर कोणीही घेतलेले नसावे. कोणी आधी घेतले असेल तर दुसरे नाव द्यावे लागते. ते देऊन झाले की तुमचा ब्लॉग आयडी तयार होतो. तो असा : आयलव्हक्रिकेट डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम. ब्राऊझरमध्ये तो आयडी टाइप केला की तात्काळ ही ‘डायरी’ ओपन होते. तिच्यात रोजच्या रोज लिखाण करू शकता. एखादे मूल घरात जन्माला आले असेल तर त्याच्या आयुष्याचा पहिल्या दिवसापासूनचा लेखाजोखा या डायरीत लिहिण्याची कल्पना कशी आहे? मोठे झाल्यावर त्या मुलाने वा मुलीने ते वाचल्यास मोठी गंमत वाटेल.

हे ब्लॉग फक्त मजकुराचेच असावेत असे बंधन नाही. एखादा फोटोग्राफर फोटोतून अधिक ‘बोलतो’. तो ते कदाचित शब्दांतून व्यक्त करू शकणार नाही. त्याचा ब्लॉग हा फोटोंचाच ब्लॉग असू शकतो. एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर तो स्वत:ची अथवा नामवंत चित्रकारांची चित्रे (अर्थात कॉपीराइटचा विचार करून) ब्लॉगवर टाकू शकतो. त्याला आर्टब्लॉग म्हणतात. फक्त व्हीडीओचीच देवाणघेवाण करायची असेल तर तसा ब्लॉग होतो. त्याला व्ह्लॅाग म्हणतात. तसाच म्युझिक ब्लॉग, स्केचब्लॉग होतो. काहीही असले तरी या सर्वांचा मूळ हेतू परस्परसंवाद असाच आहे.

तुमच्या मित्राचा ब्लॉग आयडी माहीत असेल तर तो टाइप करून पेज ओपन करा आणि त्यातील एंट्रीज वाचून तुमची कॉमेंट पोस्ट करा. मात्र तुम्ही निनावी कॉमेंट करू शकत नाही. तुमचा मेल अॅड्रेस व पासवर्ड द्यावाच लागतो. अन्यथा कोणीही कोणाचाही ब्लॉग ओपन करून काय वाट्टेल ते लिहित राहील. अर्थात ही पद्धतही फुलप्रूफ नाही. एखाद्या बोगस नावाने एखाद्याने ईमेल आयडी ओपन केला तर तुम्ही काय करणार? असो. ब्लॉगधारक जेव्हा ही ‘डायरी’ ओपन करील तेव्हा ही कॉमेंट दिसेल. ती वाचून तुम्ही नवीन एंट्री पोस्ट करू शकता. असेच हे चक्र चालू राहते.

हा ब्लॉग फक्त खासगीच हवा असे नाही. मित्रमैत्रिणींचा एखादा ग्रुप एकत्रितपणे एखादा ब्लॉग चालवू शकतात. कॉलेज लाइफ अथवा त्यानंतर आपापल्या मार्गाला लागल्यावरही एकत्रितपणे गप्पांचा अड्डा जमवू शकतात. प्रत्येकाने एकमेकांना ईमेल पाठविणे हा पर्याय आहेच. पण खुलेआम एकमेकांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि आयडियाज शेअर करणे यासारखा दुसरा आनंद नाही.

एका संगणकावरुन दोन याहु मेसेन्जर लॉग इन करा  

Posted by शैलेश पिंगळे

एका संगणकावरुन दोन याहु मेसेन्जर लॉग इन करा काय खर वाटत नाही ना पण हे खर आहे मित्रांनो
तुम्ही तुमच्या संगणकावरुन दोन युजर याहु मेसेन्जर वर लॉगइन करु शकता
कसे त्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकाच्या रजीस्ट्री फाईलमधे थोडा बदल करवा लागेल तो असा

एका संगणकावरुन दोन याहु मेसेन्जर लॉग इन करा काय खर वाटत नाही ना पण हे खर आहे मित्रांनो
तुम्ही तुमच्या संगणकावरुन दोन युजर याहु मेसेन्जर वर लॉगइन करु शकता
कसे त्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकाच्या रजीस्ट्री फाईलमधे थोडा बदल करवा लागेल तो असा

प्रथम तुमच्या संगणकाच्या START RUN मधे जा
तेथे टाईप करा regedit आता एन्टर करा
त्यानंतर त्यातील HKEY_CURRENT_USER सिलेक्ट करा
त्या मधे software फोल्डरवर जावुन
त्यात yahoo सिलेक्ट करुन त्यातील Pager आणि त्यात Test फोल्डर सिलेक्ट करा
आता उजव्या बाजुल एक नविन
DWORD VALUE की तयार करा तिला नाव द्या plural
आणी तिचि व्हॅलु द्या 1 आनी ते सर्व सेव्ह करा
बघा तुमचा याहु मेसेन्जर किति वेळा वेगवेगळ्या युजर अकांउट्ने लोगिन होईल

NTLDR is Missing असा मॅसेज देउन संगणक बंद झाल्यास काय करावे ?  

Posted by शैलेश पिंगळे

जेव्हा कधी आपण आपला संगणक सुरु करतो व आपणास
NTLDR is Missing
Press any key to restart

Boot: Couldn't find NTLDR
Please insert another disk

NTLDR is missing
Press Ctrl Alt Del to Restart

असा सन्देश विंडोज कडुन दाखवला जातो तेव्हा आपली NTLDR file परत विंडोज मधे रिस्टोर करवी लागते ती कशी करावी या बदद्ल थोडिशी ही माहीती...

जेव्हा कधी आपण आपला संगणक सुरु करतो व आपणास

NTLDR is Missing
Press any key to restart

Boot: Couldn't find NTLDR
Please insert another disk

NTLDR is missing
Press Ctrl Alt Del to Restart

असा सन्देश विंडोज कडुन दाखवला जातो तेव्हा आपली NTLDR file परत विंडोज मधे रिस्टोर करवी लागते ती कशी करावी या बदद्ल थोडिशी ही माहीती...

प्रथम आपण विंडोज एक्स्पी किवा जी कोणती ऑपरेटींग सिस्टीम जी तुमच्या संगणकात ईस्टॉल केली असेल त्याची cd cd drive मधे insert करावी संगणक cd drive ने बुट करावा आनी ऑपरेटींग सिस्टीमच्या सेटअप फाईल कॉपी होउन द्याव्यात आनी जेव्हा तुम्हाला विंडोज कडुन i agree prss F8 असा संदेश दाखविला जाईल त्यानंतर तुम्हाला तो रीपेअर विंडोज साठी विचारणा करेल तेव्हा रीपेअर ऑप्शन सिलेक्ट करुन नंतर cd मधुन NTLDR व NTDETECT.COM या फाईल विंडोजच्या root directory मधे पेस्ट करव्यात त्यासाठी पुढील command वापरावेत

copy e:\i386\ntldr c:\

copy e:\i386\ntdetect.com c:\

त्यानतंर तुमचा विंडोज पुनः सुरु करावा
तुमची ऑपरेटींग सिस्टीम व्यवस्त्तीत चालु होईल.

©2007-2008 शैलेश पिंगळे .सर्व हक्क सुरक्षीत.लेखकाच्या पुर्वपरवानगीशिवाय या ब्लॉगवरील लेख पुन:प्रसिद्ध करु नयेत.