कॉप्युटर हार्डवेअर.भाग १  

Posted by शैलेश पिंगळे

संगणक हे ईलेक्ट्रोनिक उपकरण आहे हे उपकरण इनपुट्चा स्वीकार करण्यासाठी सुचना घेते इनपुटवर प्रक्रिया करते आणी माहिती देते संगणकाचे चार मुख्य प्रकार आहेत आपण आता ते पाहु.

संगणकाचे चार मुख्यप्रकार

१ सुपरकॉप्युटर Supercomputer
२ मेनफ्रेम कॉप्युटर Mainfrem computer
३ मिनिकॉप्युटर Minicomputer
४ मायक्रोकॉप्युटर Microcomputer

  • सुपरकॉप्युटर (Supercomputer)

हा कॉप्युटरमधील सर्वात शक्तीशाली प्रकार आहे. याला महासंगणक असे म्हणतात ही विशेष क्षमता असलेली मशीन्स मुख्यत: मोठया संस्थाकडुन वापरली जातात उदा: आकाश शोध मोहिमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नासा सुपरकॉप्युटरचा वापर करते. भारतामधे सी डॆक C-DAC आणी टाटा कन्सल्टन्सीने आजपावोत असे संगणक तयार केलेत हा खुप खर्चीक आणी खुप गुंतागुतीचा प्रकार आहे.

नासाच्या कोलंबियामधील महासंगणक हा एका सेकंदा मधे १००० अब्ज गणित करु शकतो

  • मेनफ्रेम कॉप्युटर Mainfrem computer

हे मुख्यत्वे वातनुकुलित जागेत वापरले जातात. हे अगदी सुपरकॉप्युटर इतके जरी ते शक्तीशालि नसले तरी मेनफ्रेमद्वारे वेगवान प्रक्रिया शक्य होते तसेच डेटा साठविता येतो उदा., विमा कंपन्या लाखो विमाधारकांच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी व ती साठविण्यासाठी मेनफ्रेम कॉप्युटरचा वापर करतात आपल्या ईथे भारतीय रेल्वे तिकीट बूकिंग करण्यासाठी अशा प्रकारचे मेनफ्रेम कॉप्युटर वापरतात.

  • मिनिकॉप्युटर Minicomputer

याला मिडरेंज कॉप्युटर असे ही म्हणतात. या मशिनचा आकार रिफ्रिजरेटरएवढा असतो. मध्यम आकाराच्या कंपन्या किंवा मोठ्या कंपन्यांचे मोठे विभाग विशिष्ट उद्देशासाठी याचा वापर करतात. उदा., उत्पादन विभागामधे मिनि़कॉप्युटचा वापर केला जातो तो प्रामुख्याने उत्पादनप्रक्रिया नियंत्रीत करण्यासाठी

  • मायक्रोकॉप्युटर Microcomputer

कमी शक्ति असली तरी याचा वापर मात्र मोठया प्रमाणावर केला जातो. याची लोकप्रियताही वाढताना दिसत आहे.
मायक्रोकॉप्युटरचे चार प्रकार आहेत - डेस्कटॉप , नोटबुक्, टॅब्लेट पीसी आणि हॅण्डहेल्ड कॉप्युटर

डेस्कटॉप
डेस्कवर किंवा डेस्कच्या बाजुला मावु शकतात, मात्र ते चटकन इथुन तिथे हलविता येत नाहित.

नोटबुक्

नोटबुक कॉप्युटर्ला लॅपटॉप कॉप्युटरदेखील म्हणतात, त्याची घडी करता येते. तसेच ते वजनालाही हलके असतात, आणी ते ब्रिफकेसमधेही बसू शकतात.

टॅब्लेट पीसी
हा नोटबुक कॉप्युटरचाच एक प्रकार आहे तो हस्तलिखित सुचनांचाही स्वीकार करु शकतो. हे इनपुट डिजिटाईज्ड केले जाते, आणी त्यानंतर वर्ड प्रोसेसरसारख्या प्रोग्राम प्रक्रिया करु शकेल अशा ठराविक टेक्स्ट्मधे रुपांतरित केले जाते

हॅण्डहेल्ड कॉप्युटर
सर्वात लहान असतात आणि एका तळहातावर मावु शकतात. याना पाम कॉप्युटर असेही म्हणतात. या प्रकारच्या यंत्रणेमधे पेन इनपुट, रायटिंग रेकग्निशन , पर्सनल ऑर्गनायझेशनल टूल आणि संपर्क यंत्रणा या सर्वांचा समावेश असतो. पर्सनल डिजीटल असिस्टंट (PDA) हा मोठया प्रमाणात वापरला जाणारा
हॅण्डहेल्ड कॉप्युटर आहे

आता पुढील भगात आपण मायक्रोकॉप्युटर हार्डवेअरची माहिति घेऊ

This entry was posted on Tuesday 13 January 2009 at 3:30:00 pm . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 प्रतिक्रिया :

कृपया आपले मार्गदर्शन हवे आहे
मी HP Tablat घेऊ का?
संजीव
९८६९००८२६३

29 April 2009 at 11:45

Post a Comment

©2007-2008 शैलेश पिंगळे .सर्व हक्क सुरक्षीत.लेखकाच्या पुर्वपरवानगीशिवाय या ब्लॉगवरील लेख पुन:प्रसिद्ध करु नयेत.